◼️ शासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे : उमेश कुळकर्णी
➡️ रत्नागिरी : कोरोना महामारीच्या दोन लाटानंतर आता संसर्ग नियंत्रणात आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे जनजीवन पुर्वपदावर येत आहे. अटी-शर्थी घालून सर्व व्यवसाय, धार्मिक स्थेळे, चित्रपटगृह सुरू करण्यास आली आहेत. तसेच सार्वजनिक ग्रंथालये सुरू झाली आहेत. मात्र या ग्रंथालयांना प्रतिक्षा हे ती अनुदानाची. अनेक घोषणा झाल्या तरी अजूनही अनुदानापासून ही ग्रंथालये वंचित आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या वाचनालयाना या धक्क्यातून सावरण्यासाठी लवकरात लवकर मदत व प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी रत्नेश्वर ग्रंथालय धामणसेंचे उमेश कुळकर्णी यांनी केली आहे. राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक जीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने शासनाने नुकतीच सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यसृष्टीला चालना दिली आहे. मात्र ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा उजाडला तरी यावर्षीच्या आर्थिक अनुदानाचा पहिला टप्पा अजून मिळालेला नाही. ५५ कोटी अनुदान दिवाळीपूर्वी मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. यातून ग्रंथालयांना अनेक सुविधा, पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. मात्र दिवाळी उजाडली तरी सार्वजनिक ग्रंथालया अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने सर्वजनिक ग्रंथालयांना लवकरात लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी नगरसेवक व रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:43 PM 26-Oct-21
