नारिंगी नदीकिनारी आढळलेल्या मानवी मांस आणि बोटं प्रकरणाचे गुढ अवघ्या 24 तासांत उकलले; खेडमधील सुसेरी गावातील मनसुन्न करणारी घटना

0

खेड : तालुक्यात नारिंगी नदीपात्राजवळ एका व्यक्तीचे तुटलेली बोटं आणि मांस आढळून आले होते. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. 64 वर्षीय वृद्धाचा अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण खून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी गावातील चार तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. खेडमधील सुसेरी या गावात ही घटना घडली होती. बाळकृष्ण भागोजी करबटे (वय 65) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी स्वयम शशिकांत शिंदे (वय २१) अजय विजय शिंदे (२४), राजेश पांडुरंग पाणकर (३७), निलेश पन्दिरांग पाणकर (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून सर्व जण याच गावात राहणारी आहे. शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी बाळकृष्ण करबटे हे गावात फिरत असताना या चार तरुणांनी त्यांना जंगलाच्या दिशेने नेले त्यानंतर त्यांचा खून करून त्या वृद्धाच्या गळ्यातली सोन्याची चैन, हातातल्या अंगठ्या चोरण्यात आल्या. हातातल्या अंगठ्या निघत नसल्याने त्या तरुणांनी कोयत्याने त्यांचा बोटं तोडून अंगठी घेतली. त्यावेळी तुटलेल्या बोटांवरून पोलिसांनी पुढील तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

HTML tutorial

◼️ काय घडले होते त्या रात्री? 

रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गावातील सर्व जण हे भारत-पाकिस्तान क्रिकेट ची मॅच पाहण्यासाठी दंग होते. त्यावेळी बाळकृष्ण करबटे हे गावात कचरा टाकण्यासाठी म्हणून घरापासून काही अंतरावर असणाऱ्या ओढ्याच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी खाली काही अंतरावर जगबुडी नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तेथे त्यांना काहीतरी कारण या तरुणांनी सांगून जंगलमय भागात नेले आणि तेथे त्यांच्या अंगातले सोन्याचे दागिने चोरले, त्यांना मारहाण करत हातातली अंगठी निघत नाही म्हणून चक्क कोयत्याने त्यांचे बोट तोडले आणि सोन्याची अंगठी चोरली आणि त्यांचा मृतदेह जगबुडी नदीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी करबटे बेपत्ता झाल्याने त्यांचा गावातील लोकांनी शोध सुरू केला आणि नदीकिनारी त्यांना तुटलेले बोट, एक बॅटरी आणि मांसाचा एक तुकडा निदर्शनास आला. त्यावेळी गावकरी घाबरून गेले आणि काहीतरी विपरीत घडल्याच्या संशयावरून त्यांनी खेड पोलीस ठाण्यात कळवले. खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आरोपींचा कसून तपास सुरू केला. श्वान पथक मागवण्यात आले. फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाला यश आले पोलिसांच्या श्वानाने आरोपींचा माग काढत रात्री थेट आरोपींच्या घरापर्यंत धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत एकएक आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर दुसऱ्या बाजूला करबटे यांचा नारिंगी नदीत फेकलेला मृतदेह खेडमधील रेस्क्यू टीम च्या सहकार्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:43 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here