जिल्हा बँक निवडणूक: सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे 9 उमेदवार बिनविरोध

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे 9 उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे 21 पैकी 12 जागांवर निवडणुक निश्चित झाली आहे. आरडीसीसी बँक निवडणुकीसाठी 39 उमेदवारांचे 88 अर्ज दाखल झाले होते. त्यातील काही जणांनी चार तर काहींनी दोन अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रिया सोमवारी (ता. 25) दिवसभरात पूर्ण करावयाची होती, मात्र उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे त्यावरील सुनावणीला रात्री उशीर झाला. काही अर्जावर मंगळवारीही सुनावणी झाली. एकवीसपैकी सहा जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा एकमेव अर्ज दाखल होता. छाननीतही ते अर्ज वैध ठरल्याने जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक राजेंद्र सुर्वे, सुधीर कालेकर, अॅड. दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर अधिकृतरित्या बिनविरोध निवडून आले. त्यात आणखी तीन जणांची भर पडली. मंडणगड तालुका मतदारसंघातून रघुनाथ पांडुरंग पोटसुरेंचा अर्ज अवैध ठरल्याने सहकारचे रमेश राजाराम दळवी बिनविरोध झाले. राजापूरमधून रवीकांत केशव रूमडेंचा अर्ज अवैध ठरल्याने सहकारचे महादेव दत्तात्रय सप्रे, तर इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून रवीकांत रूमडेंचा अर्ज बाद ठरल्याने रामचंद्र गणपत गराटे बिनविरोध झाले. नऊ उमेदवार निवडणून आल्यामुळे बँकेवर सहकारचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. 25) रात्री उशिरापर्यंत सुरु राहिलेल्या छाननी प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी आक्षेप नोंदवले होते. सहकार पॅनेलतर्फे अॅड. दीपक पटवर्धन तर विरोधकांतर्फे अॅड. भाऊ शेट्ये यांनी बाजू मांडली होती. महिला राखीवमधून नेहाली लिलाधर नागवेकरांचा अर्ज अवैध झाला तर सौ. नेहा रवींद्र माने, सौ. दिशा दशरथ दाभोळकर, सौ. स्नेहल सचिन बाईत, अश्विनी जालिंदर महाडिकांचा अर्ज वैध ठरला. विमुक्ती जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सुरेश मारूती कांबळे, सचिन चंद्रकांत बाईत वैध ठरले. औद्योगिकमधून मधुकर शंकर टिळेकर, हरेश्वर हरिश्चंद्र कालेकर, इब्राहीम अहमद दलवाईचा अर्ज वैध झाला. मजूरमधून दिनकर गणपत मोहिते, राकेश श्रीपत जाधव, राजेंद्र मधुसुदन घागांचा अर्ज वैध ठरला. नागरी पतसंस्थामधून नित्यानंद भार्गव दळवींचा अर्ज अवैध झाला असून संजय राजाराम रेडीज, अॅड. सुजित झिमण यांचे अर्ज वैध ठरले. जिल्हास्तरीय कृषी पणनमधून आमदार शेखर निकम, सुनितकुमार आमगौंडा पाटील, महेश रवींद्र खामकरांचा अर्ज वैध ठरला. कुक्कुटपालनमधून अमजद लतिफ बोरकर, विवेक शिवाजीराव सावंत, दूधसंस्था मतदारसंघातून गणेश यशवंत लाखण, अजित रमेश यशवंतरावांचा अर्ज वैध ठरला. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सचिन नथुराम गिजबिलेंचा अर्ज अवैध ठरला असून गजानन कमलाकर पाटील, प्रल्हाद महादेव शेट्ये यांचे अर्ज वैध ठरले. लांजा मधून सुरेश विष्णू साळुखेंचा अर्ज अवैध ठरला असून आदेश दत्तात्रय आंबोळकर, महेश रवींद्र खामकरंकोच अर्ज वैध ठरले. गुहागरमधून अनिल विठ्ठल जोशी, चंद्रकांत धोंडू बाईत यांचे अर्ज वैध ठरले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:21 AM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here