रत्नागिरी नगर परिषदेतर्फे बाजारपेठेत कापडी पिशव्यांचे वाटप

0

रत्नागिरी : प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून दुकानदारांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने शहरातील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी’ हा उपक्रम राबवण्यात आला. प्लास्टिक पिशव्या पर्यावरणाला हानिकारक असतात. दुकानांमध्ये पन्नास पेक्षा कमी मॅक्रॉनच्या पिशव्या वापरण्यास बंदी आहे. अशा प्लास्टिक पिशव्या वापरल्या जाऊ नयेत यासाठी न. पं. च्या घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यात येते. दंडात्मक कारवाईसुद्धा केली आहे. तरीही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. यासाठी सभापती निमेश नायर यांनी कापडी पिशव्या वाटण्याचा निर्णय घेतला. राम आळी, गोखले नाका, मारुती आळी अशा ठिकाणी विविध दुकानांमध्ये आरोग्य निरीक्षक कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी हा उपक्रम राबवला. यावेळी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत, असे आवाहनही आरोग्य सभापतींनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here