आर्यन खानसोबत ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या दोघांना जामीन

0

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ज्या प्रकरणात आरोपी आहे, त्याच प्रकरणात मंगळवारी दोघांना जामीन मिळाला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना मंगळवारी जामीन मंजूर केला. राजगढिया हा या प्रकरणातील 11वा आरोपी असून त्याला एनसीबीने 2.4 ग्रॅम गांजासह अटक केली आहे. त्यांचे वकील अजय दुबे यांनी सांगितले की, मनीष राजगढिया याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. राजगढिया हा व्यावसायिक असून तो गोव्याहून मुंबईला येत असताना त्याला अडवण्यात आले. मनीषकडून 2.4 ग्रॅम गांजा सापडल्याचा आरोप होता. मात्र, त्याच्याकडून काहीही सापडले नसल्याचे पंचनाम्यात लिहिले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here