रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी, माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी व माजी विद्यार्थी मंडळ, शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे विषय शिक्षक संघटनांच्या प्रमुखांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी प्राचार्या डॉ. रमा भोसले, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, माजी विद्यार्थी मंडळ अध्यक्ष रविंद्र इनामदार, सचिव गणपती एडवी, सर्व विषय संघटना प्रमुख उपस्थित होते. कोविड-19 नंतरच्या परिस्थितीत बऱ्याच कालावधीनंतर शाळा सुरु झाल्या असून शिक्षकांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विस्तार केंद्रामार्फत शिक्षकांसाठी प्रशिक्षण व वर्षभराच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांनी याप्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमृतनिधी उभारण्याची संकल्पना मांडली. तसेच माजी विद्यार्थी मंडळाच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना भविष्यातील करियर निवडण्यासाठी उपयुक्त होईल असे व्यवसाय मार्गदर्शन कक्ष उभारण्याचा मानस व्यक्त केला. शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी हे महाविद्यालय नेहमीच सहकार्य करेल व शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षण वर्ग आयोजित करेल असे सांगितले. शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी सदैव स्वतःला अपडेट ठेवण्याचे आवाहन केले. तसेच अध्यापनात नवनिर्मिती व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व सांगितले. उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध असण्याची गरज व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून कार्यरत राहण्याचे महोगत व्यक्त केले. विस्तार सेवा केंद्रप्रमुख डॉ. रमेश भोसले यांनी अध्ययन-अध्यापनात प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माजी विद्यार्थी मंडळ अध्यक्ष रविंद्र इनामदार यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या सहविचार सभेला महाविद्यालयाचे प्रा.डोणे, प्रा.चाकोते, प्रा.देशपांडे, डॉ.लिहितकर, डॉ.के.ए.मस्के, माजी विद्यार्थी मंडळ सल्लागार श्री विनायक हातखंबकर यांनी देखील मार्गदर्शन केले. याप्रसंगी गणित विषयाचे श्री प्रकाश पांढरे, महेंद्र साळवी, प्रताप सुर्वे, अमोल टाकळे, मराठी विषयाचे निलेश कुंभार, विज्ञान विषयाचे प्रभाकर सनगरे, व्यवसाय मार्गदर्शन विषयासाठी संदेश रहाटे, संस्कृत विषयासाठी रविंद्र पाटणकर, शारीरिक शिक्षण विषयासाठी राजेश जाधव व माजी विद्यार्थी मंडळ सदस्य अनंत जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणपती एडवी व आभार श्री.विजय वाघमारे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 27-Oct-21
