स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले : रणजित सावरकर

0

रत्नागिरी : अस्पृश्यता हा मानवतेला कलंक आहे, हे सावरकरांना पूर्ण मान्य होते, त्यांनी त्याचे मूळ नेमके कुठे आहे ते शोधले, संशोधन केले, तेव्हा त्यांना या अस्पृश्यतेचे मूळ जातिभेदात असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे मूळ कापण्याचे ठरवले आणि त्यानुसार स्पर्शबंदी ही बेडी तोडली. अशा प्रकारे हिंदु धर्मांतर्गत असलेल्या सात शृंखला वा सात बेड्या-बंद्या सावरकरांनी तोडल्या. समाजाला त्याद्वारे दिशा देत हिंदुत्वाला सबळ करण्याचे काम केले, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी नुकतेच येथे केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च, (आयसीएचआर) नवी दिल्ली यांच्यावतीने दोन दिवसांचा राष्ट्रीय परिसंवाद आणि आंतरजाल माध्यमाद्वारेही प्रसारित होणारा वेबिनार संपन्न झाला. सावरकर पुढे म्हणाले की, हिंदु धर्म जो विभाजित झाला आहे तो, एकत्र करणे गरजेचे आहे, संघटित करणे आवश्यक आहे हे ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू धर्मातील जातीभेद नष्ट करून त्यात असलेल्या सात बेड्यांची बंधने संपुष्टात आणण्याचे काम हाती घेतले. या सात बेड्या कशा प्रकारे धर्माला मारक होत्या, त्याचे विश्लेषणही यावेळी रणजित सावरकर यांनी केले. जातिभेदामुळे हिंदु धर्माला समाजाला धोका पोहोचत असल्याचे लक्षात आल्याने आणि देशाला त्यामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेत सावरकर यांनी रत्नागिरी येथे त्यांना स्थानबद्ध केले तेव्हा हे कार्य हाती घेतले आणि हिंदुत्व हे पुस्तकही त्यांनी येथे लिहिले. सावरकर यांच्या कृतीमुळे त्यावेळी रत्नागिरीत हॉटेलांमध्ये अस्पृश्यांनाही प्रवेश मिळाला. त्यावेळी मुंबईत मात्र अस्पृश्यांना वेगळी वागणूक मिळत होती, हे ही रणजित सावरकर यांनी लक्षात आणून दिले. तिभेदाबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तपशीलवार अभ्यास करून लोकांपुढे माहिती मांडली आहे. ४००० पेक्षा अधिक जाती अस्तित्त्वात होत्या आणि सर्व समाज विघटित झाला होता. यामुळेच मानवता कलंक असणारा अस्पृश्यतेचा प्रश्न आणि समाजापुढे असणारी ही कुप्रथा तसेच ब्राह्मणांमधीलही भेद, व्यवसायताली भेद, पंथातून निर्माण झालेले भेद, खाण्यापिण्याच्या सवयीवरून असलेले भेद अशा प्रकारे असणारे भेद हे संपूर्ण समाजालाच घातक होते. अशा प्रकारे चार हजारपेक्षा अधिक जाती होत्या आणि त्याचे विश्लेषण करीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जातिभेद हे समाजासाठी मोठे संकट असल्याचेच दाखवले होते. यातून हिंदुच हिंदुंना नुकसान पोहोचवित आहेत. त्यातील कुप्रथा लक्षात घेऊन जातिभेदाची प्रथा नष्ट करण्याचे आटोकाट प्रयत्न स्वातंत्र्यवीरांनी केले, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here