चोरवणेत तरुणीची गळफास घेत आत्महत्या

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे माळचीवाडीतील १६ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वा. उघडकीस आली. याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी रामचंद्र कांबळे (१६) हिची नजर कमी होती. त्यातच तिला डोकेदुखीचा वारंवार त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून तन्वी हिने राहत्या घरातील लाकडी भालाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची फिर्याद तन्वी हिची आई गीता कांबळे यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दिली आहे. यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. देवरूख पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. या बाबतचा अधिक तपास देवरूख पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here