साखरपा : पोलवरून तुटून लोंबणाऱ्या महावितरणच्या तारेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना कोंडगावात घडली असून त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. कोंडगाव येथील सखाराम विठ्ठल हेगिष्टे हे शुक्रवारी सकाळी गुरे चरवण्यासाठी गेले होते. त्यांची एक म्हैस वाडीतील शाळेजवळ चरत होती. शाळेच्या इमारतीला लागून असलेल्या महावितरणच्या पोलवरून एक विद्युत भारित वाहिनी तुटून जमिनीवर पडली होती. त्या तारेचा स्पर्श होऊन म्हशीला शॉक लागला. यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला. म्हैस ही मुर्रा जातीची असल्यामुळे किमान ८० हजारांचे नुकसान झाल्याचे मालक सखाराम हेगिष्टे यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती हेगिष्टे यांनी महावितरणच्या साखरपा विभागाला दिली असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 27-Oct-21
