रत्नागिरी : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता पेट्रोल, डिझेलवर अनुदान देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत खूप वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या आसमानी किमतीमुळे महागाई खूपच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महागाईचा फटका शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. कृषी कार्यात उपयोगी पडणारी अनेक उपकरणे ही डिझेलवर चालतात. त्यामुळे शेतीसाठी होणारा खर्च हा कितीतरी पटीने वाढला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट घडून येत आहे. यांत्रिकी शेती करताना आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मत्स्य व्यावसायिकांप्रमाणे शेतकऱ्यांनाही आता अनुदान तत्त्वावर डिझेल उपलब्ध होणार आहे. पेट्रोल व डिझेलने शंभरीचा आकडा पार केला आहे. शेतकऱ्यांना या महागाईमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या योजनेनुसार कृषी कार्यात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रती लिटर २० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 27-Oct-21
