खेड : शासकीय खर्चातून बांधलेले शौचालय चोरीला गेले असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी तालुक्यातील सुकिवलीतील ग्रामस्थ काशिनाथ सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील सुकिवली येथे शौचालयाची टाकी स्वतःच्या जागेत बांधण्याऐवजी रस्त्याच्यालगत भूसंपादित जागेत एका लाभार्थ्याने बांधली आहे. या बांधकामास ग्रामस्थ काशिनाथ सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत सुकिवली, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सुकिवली, पंचायत समिती खेड, जि. प. बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. सुकिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक हे प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यास आले असता त्यांच्या समक्ष लाभार्थ्यांनी काशिनाथ सूर्यवंशी यांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 27-Oct-21
