सचिन वाझेच्या नजरकैदेला एनआयएचा विरोध

0

मुंबई : कार बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तळोजा कारागृहातून नजरकैदेत ठेवण्यासंदर्भात केलेल्या अर्जाला एनआयएने विरोध केला. वाझे याची जामिनावर सुटका केली, तर तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आणि फरार होऊ शकतो, असे एनआयएने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी वाझे याच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. तळोजा कारागृहात योग्य त्या वैद्यकीय सुविधा, तसेच स्वच्छता नसल्याने तीन महिने आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी वाझे यानी याचिकेद्वारे केली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here