प्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान 2022 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीची शपथ फाटक हास्कूलमध्ये संपन्न

0

रत्नागिरी : बुधवार दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी रत्नागिरी नगर परिषद व दिव्य स्वप्न फाउंडेशन आणि फाटक हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने फाटक हायस्कूल मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान 2022 या विषया संदर्भात शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाची अतूट नाते आहे आणि सर्वजण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊन पर्यावरणाचा समतोल राखू आणि भारतीय परंपरेतील सण आणि उत्सव साजरे करू अशा प्रकारची ही शपथ फाटक हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना देण्यात आली. या शपथ देण्याच्या प्रसंगी रत्नागिरी नगरपरिषद व दिव्य स्वप्न फाउंडेशन स्वयंसेवक श्री. शिवराज जाधव, श्री. अभिजीत जाधव तसेच श्री. रेशम जाधव हे उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. पाटणकर व पर्यवेक्षक श्री. किर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक श्री. वळवी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिक्षक श्री. अनंत जाधव यांनी ही शपथ विद्यार्थ्यांना दिली.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here