कारला धडक दिल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीची कारला धडक बसून अपघात झाल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४५ वा. घडली. अजय अंबरनाथ कारेकर (२१, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात शीतल शिवाजी मतकर (३८, रा.पर्णिका एम्पायर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:25 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here