आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे महाराष्ट्रीतील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर एक ना अनेक आरोप केले आहेत. अगदी समीर वानखेडेंचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफीयांशी संबंध आहेत, त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे,असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंवरच्या या गंभीर आरोपांवर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, स्ट्राँग राहा असं बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील लोक लपून मेसेज करत आहेत. पण ते सर्वजण सोशल मीडियावर येण्यास घाबरत आहेत. समीर वानखडेंना पाठींबा दिला तर पुढे चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, अशी भीती अनेक कलाकारांच्या मनात आहेत, असे क्रांती या पत्रकार परिषदेत म्हणाली होती. तिच्या या पत्रकार परिषदेनंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार क्रांतीला पाठींबा देत पुढे आले आहेत. अभिनेत्री मेघा धाडे हिने क्रांतीला पाठींबा दिला. आता मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर यानेही क्रांतीला पाठींबा जाहीर केला आहे. ‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीतील अनेक मित्र तुला पाठींबा देण्यासाठी उघडपणे व्यक्त होत नाहीयेत. सोशल मीडियावरून सुरू असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम खरंच अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे की आपण खूप चांगले मित्र नाही आहोत, पण तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं ट्वीट आरोहने केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 27-Oct-21
