साडवली : संगमेश्वर नजीकच्या आंबेडखुर्द येथे होत असलेल्या कुणबी भवनाचा पायाभरणी सोहळा शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पायाभरणी सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, ना. उदय सामंत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार शेखर निकम, कुणबी समाज नेते सहदेव बेटकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड, संगमेश्वर-देवरूख सभापती जया माने, जि. प. सदस्या माधवी गीते, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सीताराम शिगवण, आंबेड खुर्द सरपंच चंद्रकांत फणसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुणबी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:16 PM 27-Oct-21
