अपघातात तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराला एक महिना साधी कैद

0

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे- बाऊल येथील एक वळणावर दुचाकी खडीवरुन घसरुन अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुखापतीस व मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने दुचाकीस्वाराला एक महिन्याची साधी कैद व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रथमेश प्रकाश बारगुडे (वय ३०, रा. लाजूळ – करबुडे, ता. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १३ सप्टेंबर २०१७ ला सकाळी साडेसहाच्या सुमारास उक्षी ते करबुडे रस्त्यावर बाउल येथील वळणावर घडली होती. आरोपी प्रथमेश व त्याचा सख्खा चुलतभाऊ मयत निखिल अनंत बारगुडे (वय ३२, रा. लाजूळ, करबुडे, रत्नागिरी) हे सकाळी गाडी धुण्यासाठी रॅम्पवर जात होते. दुचाकी प्रथमेश चालवत होता. त्याच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नव्हता. दुचाकी (क्र. एमएच -०८ टी६७०१) ही प्रथमेश चालवत होता. उक्षी ते करबुडे फाटा येथील बाऊल येथे आले असता प्रथमेशचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यावरील खडीवरुन दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीच्या मागे बसलेल्या निखील बारगुडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी निखीलचा भाऊ सुनिल बारगुडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी प्रथमेश यांच्या विरुद्ध भादवी कलम ३०४ अ, २८९, ३३७ , ३३८ , मोटार वाहन कायदा कलम १८४, ३/१८१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल पेढांमकर करत होते. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज या खटल्याचा निकाल दुसरे न्यायादंडाधिकारी रत्नागिरी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने भादवी कलम ३०४ अ मध्ये एक महिना साधी कैद व पाचशे रुपये दंड, भादवी कलम २८९ मध्ये सात दिवस शिक्षा व ५०० दंडाची शिक्षा ठोठावली. या तपासात पोलिस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत मदतनीस म्हणून काम पाहिले पैरवी अधिकारी म्हणून अनंत भिकाजी जाधव यांनी काम पाहिले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:06 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here