जि. प.च्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष विभागामार्फत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

0

रत्नागिरी : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जि. प. विभागामार्फत हा स्वच्छता सेवा उपक्रम पार पडला. या निमित्त भाट्ये समुद्र किनारा चकाचक करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी जिल्हा परिषदेसह, जिल्हाधिकारी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जि. प.पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या स्वच्छता श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच एन.एस.एस., एन.सी.सी., नेव्ही, आयटीआयचे विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्या उपस्थितीत मोहीम पार पडली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here