दापोलीत वृक्ष तोडीवर वनविभागाची कारवाई

0

दापोली : विनापरवाना साग आणि शिवण या वृक्षांची तोड केल्याप्रकरणी दापोली तालुक्यातील वावघर, उन्हवरे येथे वनविभागाने नुकतीच कारवाई केली आहे. वावघर येथील शंकर गुरव यांच्या मालकीच्या जागेत असेलेली २१ सागांची झाडे उन्हवरे येथील महामूद मुजावर यांनी सोहेल मुजावर, ज्ञानेश्वर घाग, मुजीब साखरकर या मजुरांच्या सहाय्याने तोडल्याप्रकरणी बेकायदेशीर वृक्षतोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरारे येथील इब्राहीम खोत यांच्या जागेतील ४१ साग व ४ शिवणीची झाडे उन्हवरे येथील शशिकांत पानकर यांनी संदेश जाधव, सिद्धेश पोसनाक, महेंद्र तांबे, मंगेश पोवार, योगेश नोगड या पाच मजुरांच्या सहाय्याने विनापरवाना तोड केल्याबद्दल शशिकांत पानकर यांच्यासह पाच मजुरांवर तसेच दोन्ही जागा मालकांविरोधात महाराष्ट्र वृक्षतोड कायदा १९६४ नुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दापोलीचे वनपाल एस. एस. सावंत यांनी दिली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडलेली झाडे जप्त केली असून जागा मालकांसह झाडे तोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या कारवाईवेळी परिमंडल वनाधिकारी एस. एस. सावंत, ताडील वनरक्षक एस. आर. गायकवाड यांनी परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here