राष्ट्रवादीचा उद्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात झंझावाती दौरा

0

चिपळूण : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर येत असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा झंझावाती दौरा आखण्यात आला आहे. या निमित्ताने प्रत्येक तालुक्यात २८ रोजी आढावा बैठका होणार आहेत. गुरुवार दि. २८ रोजी सकाळी ९:३० वा. दापोली विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होईल. यावेळी माजी आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव उपस्थित राहाणार असून सकाळी १०:३० वा. खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील होणार आहे. दुपारी १२:३० वा. गुहागर येथे गुहागर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक होईल. यावेळी सहदेव बेटकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. सायंकाळी ४ वा. चिपळूण येथे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येईल. यावेळी आ. शेखर निकम व पदाधिकारी उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वा. पत्रकार परिषद होईल. त्यानंतर ६ वा. चिपळुणातील पूरग्रस्तांच्या समस्यांबाबत शासकीय विश्रामगृह येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत चर्चा होईल. सायंकाळी ६:३० वा. पुरामुळे नुकसान झालेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचलनायास भेट देतील. दिनांक २९ रोजी रत्नागिरी येथे आगमन होईल. सकाळी ९:३० वा. जिल्हा जलसंपदा विभागाची आढावा बैठक होईल. ११ वा. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या उपस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी आढावा बैठक, १२:३० वा. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, सायंकाळी ४ वा. राजापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होईल. यानंतर ना. जयंत पाटील देवगडकडे प्रयाण करतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. बैठकीला पदाधिकारी, नगरसेवक, जि. प., पं. स. सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here