राज शिंदे, सार्थक नलावडे यांनी पटकावले बॅडमिंटनचे विजेतेपद

0

देवरूख : बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुक्यातर्फे दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २३ व २४ ऑक्टोबर रोजी देवरूख येथे करण्यात आले होते. ओपन गटामध्ये राज शिंदे आणि सार्थक नलावडे यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धा तीन गटांमध्ये खेळवण्यात आल्या. त्यामध्ये ओपन गट, महिला गट, आणि ४५ वर्षांवरील गट असे तीन गट करण्यात आले होते. ओपन गटामध्ये राज शिंदे आणि सार्थक नलावडे यांनी विजेतेपद, तर महिला गटामध्ये ऐश्वर्या प्रसादे आणि हर्षदा शेंडगे यांनी विजेतेपद पटकावले. ४५ वर्षांवरील विजेतेपद नीलेश चव्हाण आणि मोहन हजारे या जोडीने पटकावले. सर्वोत्तम खेळाडू म्हणून गिरीधन बालेकुंदरी तर बेस्ट स्मॅशर म्हणून यश मांगले याची निवड करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here