रत्नागिरी खबरदार आयोजित कराओके गीतगायन स्पर्धा ‘मेरी आवाज सुनो’ या स्पर्धेची अंतिम फेरी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत संसारे उद्यान, एकता मार्ग मारुती मंदिर रत्नागिरी येथे होणार आहे. या गीत गायन स्पर्धेत सुमारे १०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी साई मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे या स्पर्धेसाठी निवड फेरी घेण्यात आली. यामधून अंतिम फेरीसाठी २० स्पर्धकांची निवड करण्यात आली. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम फेरीच्या कार्यक्रमात कोकणातील पहिल्या टिकटॉक स्पर्धेचा निकाल देखील जाहीर होणार आहे. हा अंतिम फेरीचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनाशुल्क असून मनोरंजनाची पर्वणी ठरणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे
▪लीना विनोद खामकर
▪उदयराज शंकरराव मानकर
▪गौतमी अजय वाडकर
▪स्वरूपकुमार काशिनाथ केळस्कर
▪सिद्धी पेडणेकर
▪जागृती हेमंत देशमुख
▪राकेश विजय मोरे
▪अनुप किशोर मयेकर
▪भारत सावंत
▪सतीश रामचंद्र राठोड
▪चिन्मय जोशी
▪इशांत प्रशांत पाळेकर
▪महेश अनंत कामथेकर
▪दीपिका रोहन आठले
▪शकील नाखवा
▪संजना संतोष गांगण
▪मंजिरी महेश रजपूत
▪साक्षी आनंद पालव
▪राहुल यशवंत कांबळे
▪सानिका कमलाकर लिंगायत