ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, की भारतीय संघात टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याची क्षमता आहे. पण, त्यासाठी त्यांना पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल. म्हणजेच हार्दिक पांड्याला गोलंदाजी करावी लागेल आणि भुवनेश्वर कुमारला वेग वाढवावा लागेल. ब्रेट ली म्हणाला, की पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभूत झाले असले तरी भारत पुनरागमन करू शकतो. पांड्याच्या संघातील भूमिकेबाबत तो म्हणाला, ‘भारतीय संघ तेव्हाच मजबूत असतो जेव्हा हार्दिक पांड्या गोलंदाजी करतो, जर तो तंदुरुस्त असेल तर. आणि फिट नसेल तर भारतीय संघाला विविध पर्यायांचा विचार करावा लागेल. पण तो अष्टपैलू म्हणून संघात असावा असे माझे मत आहे. भुवनेश्वरबाबत तो म्हणाला, की ‘भुवनेश्वरचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. जगातील फार कमी वेगवान गोलंदाज हे करू शकतात. या खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्यासाठी त्याला ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करावी लागेल. त्याला वेग पकडावा लागेल आणि विविधताही हवी तो म्हणाला, “पाकिस्तानविरुद्ध अनेक प्रयोग केले, पण ते अयशस्वी झाले. तो तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा तो चेंडू गुडघ्यापर्यंत पोहोचवतो ज्यामध्ये फलंदाजाला विकेटच्या आधी किंवा मागे पायचीत होण्याची शक्यता असते. ली म्हणाला की, मोहम्मद शमी टी-20 क्रिकेटमध्ये इतका यशस्वी आहे कारण तो कसोटी सामन्याच्या लेंथने गोलंदाजी करतो. तो म्हणाला, ‘कसोटी सामन्याची लेंथ, म्हणजेच पूर्ण लेंथ आणि गुड लेंथमधील चेंडू. माझा विश्वास आहे की चेंडूने सुरुवातीच्या षटकांमध्ये कसोटी सामन्याच्या लेंथच्या चेंडूतून यश मिळते, असे त्याने म्हटले आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 27-Oct-21
