युवा स्वास्थ्य मिशन अंतर्गत खापणे महाविद्यालयात लसीकरण

0

राजापूर : श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कोकण विभाग पनवेल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र करक-कारवली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोव्हिड-१९ लसीकरण अभियान नुकतेच झाले. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शासनाने मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र करक-कारवलीच्या आरोग्य सहायिका ए. ए. पाटणकर, आरोग्य सेवक एस. एस. झोरे, एस. व्ही. किनरे, मदतनीस एस. एस. गोसावी, रुग्णवाहिका चालक व्ही. आर. निखारगे, प्रा. एस. व्ही.निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. एस. एस. वाघमारे, मुख्य लिपिक नरेश पाचलकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here