‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारच्या समितीने क्लीन चिट दिली आहे. ही जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. आता या योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्याचं ऐकलं. अजून मी अहवाल बघितलेला नाहीये. पण, मला माध्यमातून जे कळत आहे त्याने मला अतिशय आनंद होतोय. ही जनतेची योजना आहे, मुळात ही जनतेने राबवलेली योजना आहे. त्या काळात योजनेतून 6 लाख कामे झाली.यापूर्वीही उच्च न्यायालयाने देशभरातील एक्सपर्टची एक समिती तयार केली होती त्या समितीने ही योजना कशी योग्य आहे हे आणि कसं योग्य काम यात झालं आहे याचा रिपोर्टही दिला होता. तो रिपोर्टही उच्च न्यायालयाने स्वीकारला होता, असं फडणवीस म्हणाले. योजनेबाबत काही तक्रारी असू शकतात. त्याबाबत चौकशीही झाली पाहिजे अशी घोषणा मी स्वत: केली होती. 6 लाख कामे झाली आहेत त्यापैकी 600 कामांची चौकशी होणं ही काही मोठी गोष्ट नाही. जी चुकीची गोष्ट आहे त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्याकरता योजनेला बदनाम करणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here