रत्नागिरी : महिलांनी उत्पादित केलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी दिवाळी काळात मंत्रालय मुंबईत किमान तीन दिवस विक्री केंद्र उभे करण्यात येणार आहे. बचत गटातील इच्छित महिलांनी आपली नावे तीन दिवसांमध्ये जिल्हा कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांनी केले. या प्रसंगी महिला बचत गटांना 11 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत समुद्री शैवाल संवर्धन प्रकल्पाचे निधी वितरण महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रत्नगिरीअंतर्गत शहर उपजीविका केंद्रा गारमेंट युनिटचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी उत्पादित केलेले मास्क, पिशवी, गारमेंट उत्पादित वस्तूंची पाहणी करण्यात आली. महिलांच्या मालाला ई बिजनेस मार्केटिंग मिळावी याकरीता अॅमेझोन आणि फ्लिप कार्ड वर सोनचीरैया या बॅन्ड खाली महिलांची उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात समुद्र शैवाल प्रकल्पाकरीता माविमतर्फे 25 टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण पुरक कापडी पिशवी शिलाई कामांसाठी महिला बचत गटांना निधी वितरण आणि पावस ग्राम संस्थेला लोकसंचित साधन केंद्रातून मंजूर झालेल्या कर्जाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती ठाकरे म्हणाल्या की, जिल्ह्यतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्वतंत्र बॅन्ड तयार करावा. जेणे करून जिल्ह्याची स्वतःची ओळख तयार होऊन महिलांच्या उत्पादनाची विक्री होईल. महिलांना आरोग्य विमा बद्दल जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी महिलांनी शासकीय विमा काढून आरोग्याची काळजी घेतली पाहीजे. ज्या महिलांना कर्क रोग असतील, त्या महिलांसाठी एक स्वतंत्र यंत्रणेमार्फत मोफत उपचार मुंबईत केले जाणार आहेत. महिलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी लवकरंच पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून त्या स्पर्धेत विशेष पदार्थ बनवून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:49 PM 27-Oct-21
