देवरुख : दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी आयटी क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी Nityo-Infotech चा ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह राजेंद्र माने पॉलीटेक्निक येथे पार पडला. या प्लेसमेंट साठी कम्प्युटर विभागातील 2021 वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. कॅम्पस प्लेसमेंट मधील ऑनलाईन टेस्ट मधून ‘मनोज गोठणकर’ या विद्यार्थ्याची पुढील मुलाखती साठी निवड झाली आहे. कोकणात Nityo-Infotech सारख्या कंपनीचा यावर्षी राजेंद्र माने पॉलीटेक्निक येथे कॅम्पस प्लेसमेंट साठी यशस्वीरित्या नियोजन करण्यात संगणक विभाग प्रमुख अक्षय शेट्ये यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रविंद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, कॉलेजचे प्राचार्य श्री. भोपळे, संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अक्षय शेटये, प्लेसमेंट अधिकारी प्रा. रोशन डोंगरे, संगणक विभागाचे श्री. संदेश पातेरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले. यावर्षी Infosys, Wipro व आत्ता Nityo-Ingotech सारख्या मानांकित कंपन्यानी राजेंद्र माने पॉलीटेक्निकला प्राधान्य दिल्याने कॉलेजला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:01 PM 27-Oct-21
