ईश्वर प्रतिष्ठान आणि मुन्ना देसाई मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी रक्तदान

0

रत्नागिरी : ईश्वर प्रतिष्ठान आणि मुन्ना देसाई मित्रमंडळ आयोजित श्री. मुन्ना देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान झाले. 156 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अनेकांना वेळेअभावी रक्तदान न करता आल्याने परत जावे लागले. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदानाचा हा रत्नागिरीतील विक्रम आहे असे समजते. अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व शासकीय नियम पाळून हा भव्य सामाजिक उपक्रम पार पडला. यासोबतच 200 लोकांची नेत्रतपासणी सुद्धा करण्यात आली. त्यांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गरजू, वृद्ध मोतीबिंदू झालेल्या लोकांना लायन्स क्लब रुग्णालयात अत्यल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे, यासाठी आवश्यक सहकार्य ईश्वर प्रतिष्ठान करणार आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्तम नियोजनामुळे हा विक्रमी कार्यक्रम शांतपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी जि. प. शिक्षण आणि बांधकाम सभापती श्री. बाबूशेठ म्हाप, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती श्री. परशुराम कदम, हातखंबा येथील डॉ. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुन्ना देसाई आणि त्यांचे मित्रमंडळ, ईश्वर प्रतिष्ठान पदाधिकारी, ईश्वर ढाबा, सरस ढाबा टीम आदींचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, लायन्स आय हॉस्पिटल, माळी चष्म्याघर तसेच सर्व रक्तदाते, मदत करणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष श्री. सचिन शेट्ये (बंधू) आणि मुन्ना देसाई यांनी आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here