‘आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले’ : समीर वानखेडे

0

नवी दिल्ली : मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी आज निकाहनामा शेअर केला होता. ज्यामध्ये समीर यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले होते. नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर यानी उत्तर दिले की, मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे. धर्म कधीच बदलला नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मला दोन्ही आवडतात. माझी आई मुस्लिम होती आणि मी मुस्लिम पद्धतीने लग्न करावे अशी तिची इच्छा होती, म्हणून मी माझ्या आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केलं, अशी माहिती त्यांनी दिली. वानखेडे पुढे म्हणाले की, लग्न झाले त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. दोन वेगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात, तेव्हा एक विशेष करार असतो, यात धर्म बदलत नाही. काही काळानंतर आमचा कायदेशीर घटस्फोटही झाला आहे. मी जर धर्म बदलला असेल तर नवाब मलिकांनी त्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानही वानखेडे यांनी दिले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 27-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here