रत्नागिरी : रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित भव्य बक्षीस योजनेत ग्राहकांवर बक्षिसांची उधळण करण्यात येत आहे. दुचाकी गाडी, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, बेड यांच्यासारखी लाखो रुपयांची बक्षिसे दिल्यावर आता या आठवड्यात तब्बल १५०० भाग्यवान ग्राहकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. भव्य बक्षीस योजनेत सहभागी झालेल्या दुकानात खरेदी केल्यावर ग्राहकाला एक कुपन देण्यात येते. या कुपनमधून १५०० भाग्यवान ग्राहक निवडले जाणार आहेत. रत्नागिरी शहरातील सुमारे १५० दुकानदार या योजनेत सहभागी झाले असल्याने या दुकानात खरेदी केल्यावर ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. जानेवारी महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीत व्हॅगनआर कार व इतर लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी देखील ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेत सहभागी झालेल्या स्थानिक दुकानातून खरेदी करावी असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने आकरण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
06:21 PM 27/Oct/2021
