◼️ लोकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने कारवाई करण्याची मागणी
➡ रत्नागिरी : पूर्णगड मधील रहिवासी श्री. सुधीर पाथरे यांच्या बागेत काल सकाळी एक बैल वाघाच्या हल्ल्यात जखमी होऊन गतप्राण झालेल्या अवस्थेत त्यांच्या बागेत काम करणाऱ्या गड्यांच्या निदर्शनास आला. तात्काळ पोलीस पाटील संतोष पाथरे यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी वनविभागाकडे माहिती कळवली. गेल्या काही दिवसांपासून पूर्णगड मध्ये वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. 15 दिवसापूर्वी बिबट्याने पूर्णगड मधील श्री. केदार आंबरे यांची गाय मारली होती. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने यात लक्ष घालून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती श्री. सुधीर पाथरे यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 28-Oct-21
