आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

0

पुणे : आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र रात्री पुणे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या अटकेची प्रक्रिया आजच पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:11 AM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here