तारीख पे तारीख… आर्यन खानला जामीन मिळणार की कारागृहातील मुक्काम वाढणार?

0

आर्यन खान च्या जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार असून त्याची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आर्यनच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आजची (गुरुवार) तारीख दिली आहे. आज दुपारी अडिच वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे. अशातच आज तरी आर्यनला जामीन मंजूर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पार पडली. बुधवारी या प्रकरणी आर्यनसह मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतलेल्या त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि या प्रकरणातील सहआरोपी मुनमुन धमेचा यांच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. आर्यनचे वकील अमित देसाई आणि मुकूल रोहतगी यांनी कोर्टात आपली बाजू मांडली. आता गुरुवारी तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्यानं एनसीबी आपली बाजू मांडणार असून त्यांनतर न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:15 AM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here