गुहागर : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुनिल तटकरे आज गुहागर मध्ये येत आहेत. (दिनांक २८) रोजी दुपारी १.३० वाजता पाटपन्हाळे येथील पूजा हॉल मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे याच्या संयमीपणा व मतदारसंघात विकास कामे जोरदार सुरू असून यामुळेच पक्षप्रवेश ही सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षात पोकळी निर्माण झाली होती. तेव्हा अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला ऊभारी देण्याचे काम खासदार सुनिल तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते विकास कामे व अडचणी सोडवण्यासाठी जवळचे नेते म्हणून सुनिल तटकरे यांचे कडेच जातात. तटकरे यांचा संयमी पणा व झटपट काम करण्याची शैली यामुळे राष्ट्रवादी पक्षाला परत उभारी मिळत असल्याचे दिसत आहे. जेव्हा जेव्हा तटकरे यांचा गुहागर दौरा असतो तेव्हा पक्षप्रवेश असतो. मागील दौरा असताना उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे यांनी पक्षप्रवेश केला, तर नगराध्यक्ष राजेश बेडल हे पक्षात सक्रीय झाले तर त्याच्या काही कार्यकर्ता नी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्व पक्ष प्रवेश व पक्ष वाढीचे कौशल्य खासदार सुनिल तटकरे यांचेच आहे यावेळी स्वगृही आलेल्याचे पक्षप्रवेश असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र आरेकर यानी दिली
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 28-Oct-21
