एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात आजही उपोषण सुरूच

0

मुंबई : विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी उपोषणाला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला. राज्यातील जवळपास ९५ टक्के दैनंदिन फेऱ्या सुरळीत असल्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले. संयुक्त कृती समितीमधील संघटनांमध्ये एकमत नसल्याने राज्यातील ९३ हजार एसटी कामगारांच्या आशेवर पाणी फेरले गेले. दरम्यान, बुधवारी उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली असून, गुरुवारीही उपोषण सुरू राहणार आहे, असे संयुक्त कृती समितीकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:33 AM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here