एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

0

मागील महिन्यात घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षा 2021 चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम गटात यंदा 11 तर, पीसीबी गटात 17 अशा एकूण विद्यार्थ्यांनी राज्यात 100 टक्के गुण मिळाले आहेत. यावेळी एमएचटी सीईटीसाठी राज्यातून 5 लाख 4 हजार 835 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा निकाल बुधवारी सायंकाळी 7 वाजता जाहीर करण्यात आला असून सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यंसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एमएचटी सीईटी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व कृषीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जातो. यावेळी ही परीक्षा राज्याचे 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 227 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने 13 दिवसांत 26 सत्रामध्ये घेण्यात आली होती. राज्यातून पीसीएम गटातून 1 लाख 92 हजार 36 तर, पीसीबी गटातून 2 लाख 22 हजार 932 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी चे वेळापत्रक सुद्धा संकेत स्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन गुणवत्तेनुसार आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी त्यासोबत कृषिविषयक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे.
महत्वाचे म्हणजे, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपली जन्मतारिख, रोलनंबर इत्यादींची माहिती असणे आवश्यक आहे. या परिक्षेत पात्र झालेले विद्यार्थ्यी पुढे काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र असतील. त्याचबरोबर मिळालेल्या गुणांनुसार विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या फेऱ्यांसाठी ते पात्र ठरतील. त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चत होईल, असे राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:33 AM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here