देशात 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित, 733 रुग्णांचा मृत्यू

0

देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 733 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 56 हजार 386 वर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 95 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 989 आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 42 लाख 31 हजार 809 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 14 हजार 434 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:52 AM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here