राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धडाका होणार सुरू

0

◼️ रत्नागिरीसह राज्यात २६४ बाजार समित्यांच्या निवडणुका

HTML tutorial

पुणे : राज्यात २६४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धडाका सुरू होत आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरीचा समावेश आहे. कोरोना साथीमुळे रखडलेल्या निवडणुका मार्गी लागणार आहेत. बाजार आवारांमधील वातावरण हळूहळू निवडणूकमय होण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक लागलेल्या सर्वाधिक १५ बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातील तर १४ समित्या अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले. नांदेड, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी १३ समित्या, तर अमरावती, यवतमाळ, जळगावमधील प्रत्येकी १२ समित्यांच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदत संपलेल्या बाजार समित्यांची संख्या २४१ आहे, तर २३ ऑक्टोबरनंतर मुदत संपलेल्या बाजार समित्यांची संख्या २३ आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here