खेड सुसेरीमधील ‘त्या’ वृद्धाचा खून सुनियोजितपणे केल्याची बाब उघड

0

◼️ चारही संशयित आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

HTML tutorial

खेड : तालुक्यातील सुसेरी क्रमांक दोन या गावातील बेपत्ता बाळकृष्ण करबटे यांचा खून हा सुनियोजितपणे करण्यात आल्याची बाब उघड झाली असून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांची रवानगी न्यायालयाने दि. ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे. २४ रोजी रात्री करबटे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या इराद्याने नियोजन करून करबटे यांना घटनस्थळी नेण्यात आले. त्या ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने अतिशय निघृणपणे करबटे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर आठ ते दहा, पोटात तीन ठिकाणी तर मानेवर खोलवर जखमा असल्याचे शवविच्छेदनात आढळून आले. तालुक्यातील सुसेरी क्रमांक दोन येथे दि.२४ रोजी नातेवाईकांच्या कार्यासाठी मुंबई येथून आलेले बाळकृष्ण भागोजी करबटे (६५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले होते. मात्र, गावातीलच संशयित आरोपी स्वयंम शशिकांत शिंदे (२१), अजय विजय शिंदे (२६), राजेश पांडुरंग टाणकर (३६) व नीलेश पांडुरंग टाणकर (३४, सर्व राहणार सुसेरी क्रमांक दोन) यांनी त्यांना टीव्हीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरू असल्याची संधी साधून घराबाहेरून पूर्वनियोजित पद्धतीने नदीकिनारी नेले. करबटे यांच्याकडून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन त्यांचा खून करण्यात आला व मृतदेह नदीपात्रात फेकून देण्यात आला. या चारही संशयितांना भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना २६ रोजी खेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चारही संशयित आरोपींची ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here