दापोली : तालुक्यामधील इनाम पांगारी-बौद्धवाडी येथील सिद्धी तांबे या १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. गौतम भोसले यांनी दापोली पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धी तांबे हिने सकाळी ७.३०च्या सुमारास बौद्धवाडी येथील आपल्या राहत्या घरी स्नानगृहामध्ये आत्महत्या केली. स्नानगृहातील लोखंडी बारला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून सिद्धी हिने आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र समजू शकलेले नाही. दापोली पोलिस स्थानकात याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 28-Oct-21
