मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून NCB च्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.
मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी जात प्रमाणपत्रावरुनही स्पष्टीकरण दिलंय. जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे, त्याने असंच वाटतं मंत्रिपदाचं त्यांना काही देणंघेणं नाही, असेही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. क्रांती रेडकर यांच्या या वक्तव्यावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर मागचा इतिहास काढला तर महागात पडेल आणि लक्षात येईल की हमाम में सब नंगे है, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच पत्नी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडत असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या क्रुझवर अमली पदार्थाची पार्टी झाली त्यात ४ हजार जणांचा समावेश होता. मात्र त्याली फक्त सहा जणांनाच अटक कशी होते, उर्वरीत ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडण्यात आले असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 28-Oct-21
