अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

0

रत्नागिरी : दीड वर्षापूर्वी राजापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने बुधवारी २० वर्षे सक्तमजुरी आणि ४० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना जानेवारी ते फेब्रुवारी २०२० मध्ये घडली होती. इकबाल इस्माईल मोनये (३८, रा. तळगाव काझीवाडी, ता. राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडिता ही मोलमजुरी करणारी असून इकबालची तिच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. २३ जानेवारी २०२० रोजी इकबालने पीडितेला आपली रूम सारवण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. पीडितेची तब्बेत ठीक नसल्याने तिच्या आईने तिला राजापूर येथील डॉक्टरांकडे नेले असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडितेने ५ जून २०२० रोजी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी ६ जून रोजी आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६,५०६ व लैंगिक अत्याचारापासन बालकांचे संरक्षण कायदा कलम २०१२ (४) व (६) अन्वये गुन्हा दाखल केला होता. हा तपास राजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. एल. मौले करत होते. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने इकबालला शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल किरण सकपाळ व मदतनीस म्हणून अनंत भिकाजी जाधव यांनी काम पाहिले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here