‘मराठीत कार्यक्रम करा’, दीक्षांत समारोहाचं इंग्रजीतलं प्रस्ताविक राज्यपाल कोश्यारींनी थांबवलं

0

अहमदनगर : राहुरी कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं मराठी प्रेम दिसून आलं. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजीमध्ये सुरू असताना राज्यपाल कोश्यारींनी थांबवले आणि पुढील कार्यक्रम मराठीमध्ये करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात 100 टक्के कामकाज मराठीत करण्याचा आदेश काढावा अशी विनंती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यपाल यांना केली.

HTML tutorial

यावेळी राज्यपाल म्हणाले, आपण आपली मातृभाषा, मातृभूमीसाठी काही केलं नाही तर काहीच उपयोग नाही. आपण मराठीतच बोलले पाहिजे. कृषीचे विषय पुढील चार पाच वर्षात मराठीत शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा. इंग्रजी शिका त्याला हरकत नाही, पण मराठी बोला, शिक्षण द्या, असं राज्यपाल म्हणाले. उत्तराखंड मध्ये जाऊन शेतकऱ्यांना महाराष्ट्रामधून शेतीचे शिक्षण घेण्याच्या सूचना मी करत असतो, असंही ते म्हणाले. या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, शरद पवार आणि नितीन गडकरी यांचं कोणत्या शब्दात अभिनंदन करू कळत नाही. यांचे राज्यातच नाही तर देशात मोलाचे कार्य आहे. दोघांचे कार्य अद्वितीय आहे, ताऱ्यासारखे त्यांचे कार्य आहे. या दोघांकडून अजून कार्य होत राहो. निरोगी दिर्घायुष्य लाभावे, असंही राज्यपाल म्हणाले. राज्यपाल म्हणाले की, जे विद्यार्थी Phd करत आहेत त्यांनी शरद पवार यांच्याकडे जायला हवे. त्यांच्याकडे माहितीचे भांडार आहे. नितीन गडकरी यांच्या मनात रोज नव्या नव्या कल्पना कुठून येतात कळत नाही. नरेंद्र मोदी जसं नवनवीन तंत्रज्ञान आणतात तसेच गडकरींही नवीन कल्पना आणतात.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात 100 टक्के कामकाज मराठीत करण्याचा आदेश काढावा, अशी विनंती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यपाल यांना केली. पदवी देताना जो गाऊन घातला त्यात अवघडल्यासारखे सारखे त्यामुळे हा ड्रेस बदलण्यात यावा, असंही ते म्हणाले. नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन पदवीचा मान उंचावला असल्याचं ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here