खेड कॉंग्रेस कडून नगर परिषदेला कोरा धनादेश

0

खेड : खेड शहर काँग्रेसकडून सोमवारी दि.२५ रोजी खेड नगर परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा करणाऱ्या गाड्यांची दुरुस्ती व डिझेल विकत घेण्यासाठी कोरा धनादेश देण्यात आला. आर्थिक कारणे देऊन आपला नाकर्तेपणा लपवत नागरिकांना वेठीस धरू नका, अशी विनंती यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पालिकेला केली. खेड पालिकेच्या स्वच्छता व अन्य विभागातील वाहनांमध्ये डिझेल भरणे व दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेला अनेक वाहने बंद ठेवण्याची नामुष्की सहन करावी
लागत आहे. शहर कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याबात सोमवारी पालिकेचे अधिकारी रजनीकांत जाधव यांची भेट घेतली, यावेळी पक्षाकडून डिझेल टाकण्यासाठी पालिकेला कोरा धनादेश देण्यात आला. या वेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष गौस खतीब, माजी नगरसेवक बशिर मुजावर, संदीप धारिया, मुरलीधर बुरटे, खलिल सुर्वे, मंगेश भागवत व कार्यकर्ते उपस्थित होते. खेड शहरात पालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे अनेक वाहने बंद आहेत. अनियमित कचरा व्यवस्थापन यामुळे शहरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने वाहनांच्या बाबतीतील डिझेल व अन्य समस्या सोडवाव्यात, असे यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here