महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णयश

0

नुकत्याच दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलावावरती दिवंगत नेते श्री. दिग्विजय खानविलकर फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांसाठी झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रत्नागिरी शहरातील महेश मिलके जलतरण ग्रुपच्या 1} कु.करण मिलके 2}कु.तनया मिलके 3} आदिती श्रोत्री 4} आर्यन घडशी 5} आर्यन चांदोरकर 6} चैतन्य कदम 7}योगेंद्र तावडे 8} कार्तिकी भूरवणे 9} सई जाधव10} आयुष नारकर 11} संग्राम पाटील 12}सोहम साळवी अशा 12 जलतरणपटूंनी वेगवेगळ्या वयोगटातून झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महेश मिलके स्विमिंग ग्रूपच्या जलतरणपटूंनी अतिशय चांगली कामगिरी करुन तेथील आयोजकांच्या प्रशंसनेस पात्र ठरले तसेच सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या कु.करण मिलके याने 17वर्षांखालील वयोगटामध्ये 50m फ्रिस्टाईल या प्रकारामध्ये 27 सेकंद देवून सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच 100m फ्रिस्टाईल या प्रकारात 1.02 अशी वेळ देवून कांस्य पदक प्राप्त केले .
त्याच्या या चांगल्या कामगिरीबद्दल कु.करण मिलके याला आयोजन समितीच्या वतीने सुवर्ण व कांस्य पदक देवून गौरवण्यात आले. सदर स्पर्धेला सुमारे 400 जलतरणपटू सहभागी झाले होते. करण मिलके याच्या या सुवर्णकामगिरीबद्दल आयोजकांच्या वतीने त्याचे क्रिडाप्रशिक्षक (कोच)महेश मिलके यांचादेखील सत्कार करण्यात आला. महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल तसेच करण मिलके याचे सुवर्णवेध कामगिरीबद्दल खेळाडू तसेच महेश मिलके यांचे रत्नागिरी शहरातून विशेष कौतुक करण्यात आले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here