रत्नागिरी : ज्या निवृत्तीवेतनधारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडून निवृत्तिवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तिवेतनधारकांनी दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी हयात असल्याबाबतचे हयात प्रमाणपत्र १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित निवृत्तिवेतन धारकाचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तिवेतन प्रदान केले जाणार नाही. बँकेमार्फत निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वत: हयात असलेबाबत बँक मॅनेजरचे समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. घोषणापत्रे संबंधित बँकाकडे पाठविण्यात आलेली आहेत. मनिऑर्डरद्वारे निवृत्तिवेतन घेणाऱ्या राज्य शासनाच्या निवृत्तिवेतन धारकांचे हयात दाखल्यांचे नमुने कोषागार कार्यालयाकडून संबंधितांचे पत्त्यावर पाठविले आहेत. त्यांनी स्वत:चे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 28-Oct-21
