सामाजिक तेढ प्रकरणी पोलिसांशी सकारात्मक चर्चा

0

रत्नागिरी : पाकिस्तानचे कौतुक करुन समाजात तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवल्याप्रकरणी हिंदुराष्ट्र सेना व श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची भेट घेण्यात आली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली. २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा सामना सुरु होता. त्यावेळी सायंकाळी ७.३० नंतर पाकिस्ताच्या खेळाडुंचे कौतुक करणारे व भारतीय खेळाडूंच्या सांघिक कामगिरीवर हसणारे स्टेटस शहरातील पेठकिल्ला येथील शहाबाज पठाणने मोबाईलवर ठेवले होते. त्याच्याविरोधात हिंदुराष्ट्र सेना व श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तक्रारीबाबत काय कारवाई करण्यात आली याची माहिती घेण्यासाठी या संघटनांनी गर्ग यांची भेट घेतली. त्या वेळी प्रथमच असे राष्ट्रप्रेमी नागरिक राष्ट्राबाबत चर्चा करण्यासाठी आल्याचा अभिमान असल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here