चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण शहर महिला आघाडीच्या वतीने कंदील आणि उटणे प्रशिक्षण शिबिर शुक्रवार, दि. २९ रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर उपाध्यक्षा वृषाली सावंत यांनी केले आहे. हे प्रशिक्षण शिबीर शुक्रवार, दि. २९ रोजी दुपारी १ ते ४.३० वाजेपर्यंत चालणार असून शिवाजीनगर बसस्थानकसमोर घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. शिबिराचे उद्घाटन मनसे महिला तालुकाध्यक्ष शोभा पावसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मनविसेच्या तालुकाध्यक्ष अस्मिता पेढामकर यांची उपस्थिती लाभणार आहे. सहभागासाठी वृषाली सावंत, अस्मिता पेढामकर, शोभा पावसकर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करणण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 28-Oct-21
