ब्रेकिंग : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर, खान कुटुंबियाला मोठा दिलासा

0

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

HTML tutorial

या युक्तिवादादरम्यान एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे आणि तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आमच्याकडे आहेत, असा महत्वपूर्ण दावा केला. काल अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला असून एनसीबीचा युक्तिवाद आता सुरु आहे. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही, मात्र तो या कटात एक भाग आहे. त्यामुळे हा कटकारस्थानचा प्रकार असल्यास कलम ३७ हे आपसूक लागू होते आणि कटकरस्थानचे कलम २९ लागू झाले की गुन्हा गंभीर होतो. अरबाजकडे ड्रग्ज आहेत हे त्याला माहिती होते. आर्यन आणि अरबाज एकाच खोलीत राहत होते. आर्यन ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. आर्यन आता नाही तर खूप वर्षांपासून ड्रग्ज सेवन करतो. क्रूझवर ११ जण भेटणार असल्याचे कळले होते आणि त्यापैकी आठ जणांना एनसीबीने अटक केली. म्हणून आम्ही कटकारस्थान असल्याचे कलम २८ आणि २९ लावले. त्यामुळे जामीन मिळण्याविषयीच्या कठोर अटींचे कलम ३७ लागू होते. आर्यन आणि इतरांच्या अटकेच्यावेळी अटक मेमोमध्ये कलम २८ आणि २९ लावले नसले तरी मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून पहिल्यांदा कोठडी मिळवताना रिमांड अर्जात ते कलम लावलेले होते असं अनिल सिंग यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला.

तर आरोपींचे वकील युक्तिवाद करत आहेत की, रक्त तपासणी झालीच नाही. तपासणी का करायला हवी होती. कारण त्यांनी सेवन केले, असे आमचे म्हणणेच नाही. त्यांनी जाणीवपूर्वक अमली पदार्थ बाळगले होते, असा आमचा आरोप आहे. अमलीपदार्थ सेवनाचा प्रयत्न केला नसला आणि जाणीवपूर्वक बाळगले असले तरी एनडीपीएस कायद्याचे कलम २८ लागू होते. तसेच कलम ८ (सी) ची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सेवन केले नसले आणि बाळगले तरी ते कलम लागू होते, असा महत्वपूर्ण युक्तिवाद एनसीबीचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केला. आर्यन आणि अरबाझमध्ये झालेल्या व्हॉट्सॲप संभाषणातून स्पष्ट होतंय की, ते तिथं ‘खूप मजा’ (ब्लास्ट) करणार होते. अरबाझनं स्वत:हून त्याच्या बुटात लपवलेलं ड्रग्ज काढून एनसीबी अधिका-याला दिले, असा जोरदार युक्तिवाद सिंग यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:58 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here