गावठी हातभट्टीची दारू प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील साठरे बांबर येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ५६० रुपयांची १० लिटर दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी सुरेश बाबू ठोंबरे (५९, रा. कोतवडे सनगरेवाडी, रत्नागिरी) याच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२७ वा.करण्यात आली. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रतीक कांबळे यांनी तक्रार दिली आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस फौजदार इंदुलकर करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here